हातात जशा बांगड्या घातल्या जातात, बोटात अंगठ्या घातल्या जातात, त्याप्रमाणेच दंडावरही आभूषणे घातली जातात. ह्यांना ‘बाहूभूषणे’ असेही म्हणतात. मराठीत ह्यासाठीचा प्रचलित शब्द म्हणजे ‘बाजूबंद’. अगदी प्राचीन काळापासून बाजुबंद प्रचलित आहेत. बाजूबंद वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. ते कधी बांगडीसारखे दंडापर्यन्त चढवले जातात, कधी दंडावर बांधले जातात. त्यांना वाकी असेही नाव आहे. बाजुबंदाचा एक खास प्रकार म्हणजे तोळबंद. ठसठशीत घडणीचा दंडावर रूतलेला तोळबंद पारंपरिक वेशभूषेवर खूपच खुलून दिसतो. गडद रंगाच्या ब्लाऊजवर किंवा त्याच्या जरा खाली परिधान केलेला तोळबंद पारंपरिक वेशभूषेला परिपूर्ण रूप देतो. त्याचबरोबर स्लीवलेस ब्लाऊज किंवा एखादा फ्युजन ड्रेस असेल तरी त्याला ट्रेंडी बनवायला तोळबंद हवाच. त्याचा आकार कमानीसारखा असून मध्ये ठाशीव घडणीचे वर्तुळ ह्या दागिन्याला एक वेगळीच शोभा देते.
भाऊबीज ह्या चित्रपटात चित्रमाऊली सुलोचना ह्यांच्यावर चित्रित झालेल्या ह्या गाण्यात बाजूबंदाचा उल्लेख पहा
पडला पदर खांदा तुझा दिसतो ग
कमरेला कमरपट्टा कसतो ग बाई कसतो
काळ्या कुरळ्या वेणीत मरवा
जरतारी शालू हिरवा
गोर्या दंडात बाजूबंद खुलतो
A stunning and distinctive arm-piece that adds charm.
Specifications
1. Flexible
2. 92.5% Pure Silver with Antique Polish